ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ. सुभाष देशमुख यांच्याकडून जलसंपदा विभागाचा आढावा, विविध समस्यांचे निराकरण करण्याचे दिले आदेश

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व जलसंपदा विभागाच्या समस्या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांचे बैठक घेतली लवकरात लवकर सर्व समस्याचे निराकरण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता  धुमाळ उपस्थित होते.

होटगी येथे पंढरपुरी म्हैस संशोधन केंद्रकरिता २० हेक्टर जागा उपलब्ध करावी,होटगी येथे ऊस संशोधन केंद्र २० हेक्टर जागा मिळावी तसेच ड्रायपोर्टकरिता १०० हेक्टर जागा करावी, पर्यटन स्थळाकरिता २० हेक्टर जागा उपलब्ध व्हावी, सितामाई तलाव बंधिस्त पाईप लाईन गेट बसव बसवण्यासाठी निधी उपलब्ध करावा,  दक्षिण सोलापूर मतदारसंघातील कॅनॉल दुरुस्तीसाठी दुरूस्तीसाठी 30 कोटी निधी मिळावा, आमदार निधीमधून घेण्यात आलेला जेसीबी मतदार संघातील कामाकरिता परत द्यावा, वडापूर बॅरेजेस पायलॉन डिजाइन करून मिळावे, वडकबाळ व टाकळी ब्रिज कम बंधारा बांधावा, सिना नदीवरिल बरेजेसकरिता नविन लोखंडी वर्गे बसवावेत, मतदार संघातील कॅनॉलवरील झाडी काढावीत आदी विषयांवर आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि लवकरात लवकर हे विषय मार्गी लावावे असे आदेश दिले. शासन स्तरावर आपणाला जे काही करता येईल ते आपण निश्चित करू असेही आ. देशमुख यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!