ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी साधला राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले राज्यात “हा” गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे…

मुंबई : राज्यात ओमायक्रॉंन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इयर च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात काल रात्री मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात जमा बंदीची घोषणा करण्यात आली आहे. यावरून संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दिवाळीमध्ये रस्त्यावर संख्या वाढली तेव्हा कोरोना कुठे होता. आता रुग्ण संख्या वाढल्याने असे निर्बंध लादून वसुली करण्यासाठी व ओमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील “विरप्पन गॅंग” पुन्हा सक्रिय झाली आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो हे ट्विट केलेला आहे त्या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे “जय देव, जय देव, ओमीक्रोन देवा, येऊ दे, येऊ दे, वसुलीचा मेवा” असे म्हणून त्याची आरती करताना दिसत आहेत. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात व ओमीक्रोन रुग्ण वाढले असल्याने आता वसुली पुन्हा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास सक्रिय झाली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच बरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान सभेत जाणार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास वर्षा ते विधान भवन हा रस्ता खड्डे विरहीत करण्यात आला. त्यावर देखील देशपांडे यांनी भाष्य केले होते.

“मुख्यमंत्री जर राज्यभर फिरले तर काय मजा येईल ना? राज्यभर दौरे कराल का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!