---Advertisement---

राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा सुरू असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संदर्भात दिली “हि” माहिती

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : देशासह महाराष्ट्रा राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लावले जात आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा सुरूअसताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावले आहेत. त्याच बरोबर लॉकडाऊन कधी लावला जाऊ शकतो याची माहिती दिली आहे.

आज राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना संसर्ग, ओमिक्रॉनचा धोका, लॉकडाऊन आणि निर्बंध यावर भाष्य केलं. ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं.

यापुढे लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने लॉकडाऊन लावण्याचं ठरवणार आहोत. ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!