मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतांना राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
खा.संजय राऊत म्हणाले कि, वयाच्या 75 व्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील. त्याआधी ते आपले सर्व हट्ट पुरवून घेत आहेत. ‘एक देश एक निवडणूक’ हा त्यातलाच एक हट्ट. त्या हट्टासाठी देशाला मोठी किंमत मोजावी लागेल, असा जोरदार हल्लाबोल खा.राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, वेताळ ज्याप्रमाणे आपला हट्ट पूर्ण करतो, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ हा आपला हट्ट पूर्ण करण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सर्व योजना कोसळून पडल्या आहेत. ‘वन इलेक्शन’ योजनाही कोसळून पडेल.
संजय राऊत म्हणाले की, वेताळ ज्याप्रमाणे आपला हट्ट पूर्ण करतो, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ हा आपला हट्ट पूर्ण करण्याचे ठरवले आहे. मोदी यांनी 17 तारखेस वयाची 74 वर्षे पूर्ण केली. मोदी हे त्यांनीच तयार केलेल्या शब्दास जागले तर वयाच्या 75 व्या वर्षी त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागेल. 75 वर्षांनंतर कोणी सत्तेच्या पदावर राहू नये असा नियम मोदी यांनी केला. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन असे अनेक नेते मार्गदर्शक मंडळात जाऊन बसले.
संजय राऊत म्हणाले की, एक वर्षाने पंतप्रधान मोदी यांनाही जावे लागेल व त्याआधी मोदी यांना ऐतिहासिक निर्णय घेऊन इतिहासात नाव कोरायचे आहे. मोदी यांनी वर्षभरानंतर काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण आपल्या नावावर इतिहास लिहिला जावा यासाठी त्यांनी सुरू केलेल्या खटपटी देशाला खड्ड्यात घालणाऱ्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांत कोणतेच भरीव काम केले नाही. त्यांनी उत्सव आणि सोहळे साजरे केले. त्यांनी जगभ्रमण केले.
संजय राऊत म्हणाले की, मोदी यांनी सरकारी तिजोरी रिकामी केली. त्या बदल्यात देशाला काय मिळाले? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प महाशयांचा प्रचार करण्यासाठी मोदी आता अमेरिकेस निघाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीच वॉशिंग्टन येथे जाहीर केले आहे, ‘मोदी 21-22 सप्टेंबरला अमेरिकेत येत आहेत. त्यांची व माझी भेट होईल.’ ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी अमेरिकेत जात आहेत. बाकी ‘क्वॉड’ नेत्यांचे शिखर संमेलन वगैरे बहाणा आहे. एक देश, एक निवडणूक हा मोदींचा हट्ट आहे. ज्या अमेरिकेत ट्रम्प यांच्या प्रचारासाठी ते चालले आहेत त्या अमेरिकेत एक देश, एक निवडणूक वगैरे प्रकार नाही. मोदी यांनी अमेरिकेत जाऊन या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे.