ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा ट्रकखाली चिरडून जागीच ठार !

सोलापूर : वृत्तसंस्था

मंगळवेढा येथे समर्थ संप्रदायातील सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेणुका विजय तासगावकर (३८) आणि शालिनी पांडुरंग तासगावकर (६०, रा. धर्मगाव रोड, दुर्गामाता मंदिर, मंगळवेढा) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजय तासगावकर यांनी फिर्याद दिल्यानंतर ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सकाळी ७:३० च्या सुमारास रेणुका आणि शालिनी घरातून सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघाल्या. रेणुका स्कूटी चालवत होत्या. दोघी सकाळी ७:४५ वाजता विजापूर-पंढरपूर बायपास रस्त्यावर दामाजी कारखाना चौकजवळील नेने मळा येथे आल्या. तेथे क्लचची वायर तुटल्यामुळे एक नादुरुस्त ट्रक (एचआर ३८ एसी ३६७२) थांबला होता. त्याला पाठीमागून कांद्याने भरलेल्या दुसऱ्या एका ट्रकने (केए ०१ ए ६२९१) आधी जोरदार धडक दिली. नंतर तो बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनांच्या स्कूटीवर कोसळला. त्यात चिरडल्याने दोघीही जागीच ठार झाल्या.

ट्रक उलटल्यानंतर ट्रकच्या खाली दोघीही स्कूटीसह अडकल्या. ट्रकमध्ये कांदा भरलेला असल्यामुळे क्रेनच्या साहाय्याने तो उभा करण्यात आला. या वेळी कांदा बाजूला करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले. दोघींच्या मृतदेहाचे मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मंगळवेढा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!