अक्कलकोट, दि.१७ : आई वडिलांनी
मुलांना शाळेत पाठवल्यानंतर बौद्धिक क्षमता वाढवण्याचे काम शिक्षक करत असतो.
जो शिक्षक प्रामाणिकपणे मुलांना शिकवण्याचा काम करतो त्या शिक्षकाचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करत आहेत,असे मत पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केले. मोट्याळ (ता.अक्कलकोट) येथे शिक्षक गुंडू सय्यदसाब सय्यद यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.पुढे बोलताना मोरे म्हणाले, फ्रान्स सारख्या देशामध्ये शिक्षकांना संसद मध्ये उभे राहून जो सन्मान दिला जातो ती पद्धत आपल्या देशात होणे शक्य नाही.त्याठिकाणी शिक्षकांना मोठे स्थान आहे . यावेळी
सरपंच कार्तिक पाटील ,नगरसेवक प्रशांत काळे,प्राध्यापक जंगाले मेजर आणासाहेब
शिंदे ग्रा प सदस्य राजू साळुंके उपस्थित होते .श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर ता पंढरपूर येथील मोट्याळचे सुपुत्र ३५ वर्षे सेवा केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक गुंडू सय्यद यांच्या मोट्याळ ग्रामस्थांकडून नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी दिनकर काळे,अनिल इनामदार,प्रमोद जंगाले, कांत पवार,महामुद सय्यद, हरी सुरवसे,रऊप मुल्ला, यशवंत पाटील,स्वामीराव सुतार,डिगंबर इनामदार,स्वामीराव सपकाळ,प्रकाश शिंदे,प्रताप काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पवार तर आभार प्रदर्शन सुनील साळुंके यांनी केले.