ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोट्याळ विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध,चेअरमनपदी अबुजर पठाण

 

अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून पुन्हा एकदा चेअरमनपदी मोट्याळ गावचे जेष्ठ नेते अबुजर पठाण
यांची सर्वानुमते चेअरमनपदी निवड करण्यात आली.ही निवडणूक बिनविरोध पार पाडून सरपंच कार्तिक पाटील यांनी राजकीय कौशल्याची चुणूक दाखवली.व्हाईस चेअरमनपदी चंचलाबाई सुरवसे यांची निवड झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. झाली.नूतन संचालक महादेव सुरवसे,
रौऊप मुल्ला,दिनकर काळे,सुनील साळुंखे,बाबू शेख
मोहन सुरवसे,जनार्दन साळुंखे ,लक्ष्मीबाई पवार,नूर महमद शेख,काशिनाथ राठोड,विजय गेजगे हे संचालक निवडण्यात आले.निवडणूक अधिकारी म्हणून एफ.जे नाईकवाडी, सचिव प्रताप जाधव यांनी काम पाहिले.माजी तंटामुक्त अध्यक्ष नूर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच पाटील यांनी आपल्या मनोगतात येणाऱ्या काळात विविध कार्यकारी सोसायटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचे आणि सोसायटीला गत वैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले. या निवडणुकीसाठी गावातील सर्व लोकांनी सहकार्य करून या निवडी पार पाडल्या.याबद्दल सुनील साळुंखे,दिनकर काळे यांनी सर्व सभासद आणि गावकऱ्यांचे आभार मानले.या निवडणुकीसाठी उपसरपंच सैपन फुलारी व गावातील नागरिक आणि पदाधिकारी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!