ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‼️BIG BREAKING‼️ MPSC परीक्षा 21 मार्चला होणार, राज्य सरकारची घोषणा

मुंबई,दि.१२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्चला होणारी राज्यसेवा परीक्षा आता २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे. त्यासंदर्भात आज राज्य लोकसेवा आयोग हे पत्रक काढले आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च रोजी होणाऱ्या या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे गुरुवारी जाहीर केले होते. त्यानंतर राज्यभरातून शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. सर्व स्तरातून मोठा विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा घेण्यात येतील आणि नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असे गुरुवारी सायंकाळी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज राज्य लोकसेवा आयोगाने रविवारी २१ मार्च २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात येतील असे स्पष्ट केले आहे.


त्याचबरोबर 14 मार्च रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर २१ मार्च रोजी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाईल. २७ मार्च रोजी होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा ११ एप्रिल रोजी होणाऱ्या राजपत्रित गट सेवा साहित्य परीक्षा नियोजित तारखांना होतील त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असेही राज्य लोकसेवा आयोगाने कळवले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या या नवीन निर्णयाचे विद्यार्थ्यांतुन स्वागत होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!