ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी शहरात थकीत कर वसुलीसाठी नगरपालिकेची धडक मोहीम ; मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली ‘ही’ माहिती

अक्कलकोट, दि.११ : मार्च एन्डच्या पार्श्वभूमीवर दुधनी शहरातील सर्व मालमत्ताधारक, भोगवटदार तसेच भाडेकरू यांच्याकडे ९३ लाख रुपयाची थकबाकी असून असून या थकीत कराची वसुली मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली आहे.

हा कर न भरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.यामध्ये थकीत मालमत्ता कर ७३ लाख, थकीत पाणीपट्टी १७ लाख, गाळाभाडे ३ लाख असे एकूण ९३ लाख रुपये थकबाकी राहिली आहे. वारंवार सूचना करूनही न भरणाऱ्या विरुद्ध जप्तीची कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी वाळुंज यांनी दिला आहे. नगरपालिकेच्या मालमत्ताधारक ,भोगवटदार, भाडेकरू व नगरपालिका मालमत्तातील भोगवटदार यांना तशा नोटीसा पण देण्यात आल्या आहेत.

सदर कर भरून शहराच्या विकासात सहकार्य करावे अन्यथा न भरणाऱ्या व्यक्तीची नावे स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहीरपणे प्रसिद्धीला दिले जातील.त्यानंतर कोणाची तक्रार आल्यास पालिका जबाबदार राहणार नाही व कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही.त्यामुळे नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकाने विना विलंब आपले कर वेळेत भरावे. यासाठी कार्यालय अधीक्षक चिदानंद कोळी,सहाय्यक कर निरीक्षक राजेंद्र गुंड,राणी पाटील, लिपिक शांतलिंग चिंचोळी, चनमल पाटील, मल्लिनाथ म्हेत्रे, गुरुशांत मगी, बसवराज कुरले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी वाळुंज यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!