अमरावती : वृत्तसंस्था
देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी नाव व धर्म विचारात पर्यटकांना गोळ्या घातल्या तसेच कलमा वाचायला लावला, ज्यांना कलमा वाचता नाही आला त्यांना मारून टाकण्यात आले. यातून दहशतवाद्यांनी केवळ हिंदूंनाच टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले. यावर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या मुलाचे उदाहरण दिले आहे. त्या म्हणाल्या, माझा मुलगा म्हणतो मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळाी खाणार पण कुराण वाचणार नाही, असे तो म्हणाला.
नवनीत राणा म्हणाल्या, माझा मुलगा लहान आहे. मी त्याला विचारले की कलम (कुराण) वाचणार का? तर तो म्हणतो की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही. पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा तिथल्या हिंदू पर्यटकांना कलमा वाचायला लावला, पण जेव्हा त्यांनी आम्हाला वाचता येत नाही असे सांगितले तेव्हा त्यांना गोळी घालण्यात आली. आमच्या हिंदूंनी गोळ्या खाल्ल्या पण कलमा वाचला नाही, असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, जे लोक इथे राहतात, या हिंदुस्थानात राहतात पण या देशासोबत इमानदार नाही राहू शकत तर तुम्हाला या देशात राहण्याचा अधिकार नाही. आपल्याला भगवा टीका लाऊन निघायचे आहे. तो भुट्टो म्हणतो, सिंधू नदीचे पाणी थांबवले तर त्याच नदीत हिंदूंचे रक्त दिसेल, अरे अख्ख्या पाकिस्तानमध्ये ताकद नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. कारण, भारतात एक वाघ राहतात, ज्याचे नाव नरेंद्र मोदी, अमित शहा आहे. आता पाणी काय तुमचे दाना पण बंद करू.
पंतप्रधान मोदी हे भुट्टो सारख्याला भुट्ट्यासारखे भाजतील, मला मोदीजी, अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या आयपीएलचा जेवढा खर्च आहे, तितका पाकिस्तानचा जीडीपी आहे, असेही नवनीता राणा यांनी म्हटले.