ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव

अक्कलकोट : प्रतिनिधी

अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत नागनळळी येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या गौरवप्राप्तीबद्दल अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात दिनांक 28 जून 2025 रोजी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

नागनळळी आश्रमशाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य मुजावर आय.एम., मुख्याध्यापक शेख आर.जी., तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व आवश्यक निकषांची पूर्तता करून शाळेने ही यशाची पातळी गाठली आहे. शिक्षण विभागाच्या तज्ञ पथकाने शाळेची थेट पाहणी करून मूल्यांकन केले होते.

संस्थेचे सचिव जावेद पटेल यांच्या दूरदृष्टीने कमी कालावधीत सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण, भव्य वसतिगृह, आधुनिक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय व प्रशस्त क्रीडांगण असलेली शाळा उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे भटक्या आणि विमुक्त जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत आहे, असे मुख्याध्यापक शेख आर.जी. यांनी सांगितले. स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे सचिव जावेद पटेल यांनी मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!