ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नागनहळळी आश्रमशाळा राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत राज्यात प्रथम : पुण्यात झाला गौरव

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे संचालक डॉ. राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या हॅकेथॉन स्पर्धेत के.बी.एन.माध्यमिक आश्रमशाळेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्य प्रदर्शनाचे आयोजन दि.१२ मार्च रोजी पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे. आश्रमशाळेच्या विदयार्थ्यांनी बहुउददेशीय कृषी यंत्राची निर्मिती केली. त्यास राज्यातून शासकीय गटातून प्रथम क्रमांक प्राप्त झाले आहे. यंदा प्रथमच हॅकेथॉन या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये करण्यात आले होते.

विशिष्ठ समस्या सोडविण्यासाठी व नवीन संधी ओळखण्यासाठी स्पर्धक एकत्र येवून एकमेकाशी संवाद साधतात व नवनिर्मितीचे सादरीकरण करतात.हॅकेथॉनाने मानवी कौशल्य या १५ विषयांचा समावेश करुन त्यावर आधारित राज्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते.महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून ८८ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.आश्रमशाळा नागनहळळी येथील विदयार्थी जमीर जमादार,जुबेर जमादार व बसवराज आजूरे या विदयार्थ्यांनी याची निर्मिती केली असून शेतातील तण काढण्यासाठी औषध फवारणी करण्यासाठी व शेती कामासाठी वापर करता येते. हे यंत्र रिमोट कंट्रोलव्दारे नियंत्रित करता येते व त्याचे कार्य मोबाईलवरील स्क्रीनवर पाहता येते.या विदयार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान शिक्षक शंभुलिंग बशेटटी, रविंद्र नवले, अमोल पाटील व प्रयोगशाळा सहायक नुरददीन शेख यांनी मार्गदर्शन केले. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार, योजना विभागाचे संचालक महेश पालकर, बालभारती पुणेचे संचालक कृष्णकुमार पाटील, क्रीडा विभागाचे संचालक हिरालाल सोनवणे, राज्य शैक्षणिक परिषदेचे संचालक डॉ. कमलादेवी आवटे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या यशाबददल सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सचिव  जावेद पटेल, प्राचार्य आय.एम.मुजावर, मुख्याध्यापक आर.जी.शेख आदिंसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी
अभिनदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!