सत्यसाई अन्नपूर्णा ट्रस्टचा उपक्रम, नागणसुर गावातील ८५० विद्यार्थ्यांना एक दिवसाआड अल्पोपहारचे वितरण
अक्कलकोट,दि.५ : सत्यसाई अन्नपूर्णा
ट्रस्ट बेंगळुरू यांच्याकडून नागणसुर गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुरू केलेली अल्पोपहारची व्यवस्था चांगली
आहे.या माध्यमातून नाविंदगी परिवार समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करत असून याचे सर्वांनी अनुकरण करावे,असे आवाहन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.तालुक्यातील नागणसुर गावातील सर्व कन्नड मराठी,उर्दू आणि सर्व माध्यमाच्या वस्ती शाळेतील सुमारे ८५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एक दिवसाआड अल्पोपहार वितरण करण्यात येत आहे.त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.बसवलिंगेश्वर विरक्त मठाचे डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यासपीठावर स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले,कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी,सीए ओंकारेश्वर उटगे,सरपंच अंबुबाई नागलगांव,निवृत्त प्रिन्सिपाल बसवराज कोनापुरे, शेतकरी विकास सोसायटीचे नूतन अध्यक्ष
बसनिंगप्पा थंब, जिल्हा परिषद सदस्य मल्लिनाथ भासगी,जेष्ठ वैज्ञानिक राजू नाविंदगी, गीता नाविंदगी,
शांता नाविंदगी,मल्लिनाथ नाविंदगी
आदी उपस्थित होते.पुढे बोलताना म्हेत्रे
म्हणाले की,ग्रामीण भागातील गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना मध्यान्ह भोजनापूर्वी एक दिवसाआड बिस्कीट,केळी, पेरू या अल्पोपहार मिळाल्याने नक्कीच कोणतेही मूल उपाशी राहणार नाही.सत्यासाई अन्नपूर्णा ट्रस्ट सध्या २२ राज्यात पाच लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही सेवा देत आहे.तालुक्यातील समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी विधायक कार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी म्हणाले,दानशूर व्यक्तीमुळे देशाचे नांव मोठे होत असून गीता नाविंदगी,राजू नाविंदगी सारख्या दाम्पत्यांनी जन्म भूमीचे ऋण फेडण्यासाठी गावातील विद्यार्थ्यांना
अल्पोपहार व्यवस्था करून माणुसकी
जपली आहे.यावेळी विद्याधर गुरव,मल्लप्पा कवठे,विश्वनाथ देवरमनी, राजशेखर करपे,शिवलीला अंधारे,बसवराज दोडमनी, शिवशरण म्हेत्रे,राजश्री कल्याण,सायबणणा गवंडी,कल्याणी गंगोंडा,काशिनाथ प्रचंडे, मलकप्पा हिप्परगी आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक विद्याधर गुरव यांनी केले तर आभार शरणप्पा फुलारी यांनी मानले.यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.