मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून राज्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरण जोरदार चर्चेत आहे. यात आता दिशाच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आल्यानं राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.
सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता. डॉक्टर बदलले गेले. रुग्णवाहिका बदलली. तीथे जो काही प्रकार झाला तो प्रकरण दडपण्यासाठी झाला. म्हणून दबाव कमी झाल्यावर तिच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली. ते सरकारकडे नाही तर कोर्टात गेले. एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाला असेल तर पोलिसांनी त्वरीत एफआयआर दाखल करून चौकशी करावी, आरोपीला अटक करावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. हा कायदा तेव्हाही होता. माझ्याकडे कॉपी आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई का केली नाही? वाझे ताब्यात आहे. चार फटके दिले तर सर्व कळेल. या सर्वांचा कर्ताकरविता वाझे आहे. तीच्या वडिलांवर दबाव होता. हे घाणेरडे कृत्य आहे. ही मर्दानगी नाही. चारपाच लोकांनी एका मुलीला धरायचं आणि तिच्यावर अत्याचार करायचा. तुम्ही सर्वांनी पेटून उठलं पाहिजे. जगात मुंबई पोलिसांचं नाव आहे. पण ते अजून का थांबले याचं आश्चर्य वाटतं. यातील सत्य सर्वांना माहीत आहे. का नाही पेडणेकर बाईंना पोलीस ताब्यात घेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. दिशाच्या आईवडिलांवर का दडपण आणलं गेलं? असा सवालही यावेळी राणे यांनी केला आहे.
‘ माझं तेच काम आहे, यांना उत्तर द्यायचं नाही, कारण यांना पगारच इतरांवर घाण आरोप करायचा मिळतो. आपण आधी पाहिलं असेल माझ्या परिवारावर असेल माझ्या वडिलांवर असेल, माझ्या पक्षावर असेल, त्यांनी आरोप केले. त्यांना पक्ष सोडून किती वर्ष झाली मात्र त्यांच्या मनातून आम्ही काय उतरत नाही. बोलू द्या त्यांना. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात. पण कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही. आज मी एक पत्र लिहिलं आहे. मी मुखमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी मुंबईतील सगळ्याच आमदारांची आहे. 15 जानेवारी 2023 ला पत्रकार परिषद घेऊन मी ज्या घोटाळ्याला समोर आणलं होतं, त्याच्याची चर्चा आता सुरू आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.