ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यात यंदा चारवेळा होणार राष्ट्रीय लोक अदालत

सोलापूर, दि.5: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात यंदा वर्षभरात चारवेळा लोक अदालत होणार आहे. ही लोक अदालत देशभरात एकाचवेळी होणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश शशिकांत मोकाशी यांनी दिली.

शनिवार, दिनांक 10 एप्रिल, 10 जुलै, 11 सप्टेंबर, 11 डिसेंबर 2021 रोजी लोक अदालत जिल्हा, तालुका न्यायालयात होणार आहेत. या लोक अदालतमध्ये दिवाणी, फौजदारी, भूसंपादन, दरखास्त, कलम 138 चलन क्षम कायदे आणि कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट प्रकरणे, बँका, टेलिफोन कंपनी, विविध वित्तीय संस्था आदी प्रकरणे निकाली किंवा तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

लोक अदालतचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!