नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्याच्या पिढीला ‘जेन झेड’ म्हटले जाते. पण ही खऱ्या अर्थाने अमृत पिढी असून, ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. यंदाचा प्रजासत्ताक दिन ७५ वा आहे. हा दिन खऱ्या अर्थाने नारी शक्तीला समर्पित आहे, असे त्यांनी सांगितले. ‘देश प्रथम’ हे तत्त्व आजच्या युवकांनी अंगीकारावे, असे आवाहन मोदींनी केले. पर्यंत विकसित बनवण्याचे भारताला २०४७ सरकारचे उद्दिष्ट ऊर्जा देशाला आहे. या कार्यात युवकांची आणखी गतिमान करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
देशाची राजधानी नवी दिल्लीत आयोजित ‘नॅशनल कॅडेट कॉर्न्स’ (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या वेळी ते म्हणाले की, आज राष्ट्रीय बालिका दिन आहे. मुलींमध्ये आदर्श समाज व देश घडवण्याची धमक आहे. इतिहासातील विविध कालखंडात मुलींनीच पोलादी इरादे व त्याग भावनेने परिवर्तनाचा पाया रचला. एनसीसीमध्ये योगदान देत मुली शौर्याचे दर्शन घडवत आहेत. निश्चितपणे ही आनंदाची बाब आहे, असे मोदींनी नमूद केले.
सध्याच्या पिढीला ‘जेन झेड’ म्हटले जाते. पण ही खऱ्या अर्थाने अमृत पिढी असून ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष बाब अशी की, ही १९९५ ते २००९ या काळात जन्मलेल्यांना ‘जेन झेड’ संबोधले जाते. दरम्यान, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. युवकांनी ठाकूर यांचा काळ आठवावा. त्यांची कारकीर्द वाचावी व बोध घ्यावा.
बिहारचे माजी मुख्यमंत्री राहिलेले कर्पूरी ठाकूर हे आजही प्रामाणिकपणा व साधेपणासाठी ओळखले जातात. विनम्र राहून त्यांनी प्रत्येक घटकाची काळजी घेतली. याचा आदर्श युवकांनी घ्यावा. आपला वारसा व संस्कृतीविषयी अभिमान बाळगावा, असा कानमंत्री नरेंद्र मोदींनी दिला.