ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात हजर; कारवाईमागे राजकीय सुडाचा वास

मुंबई : भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावला होता. त्यामुळे खडसे चौकशीसीठी ईडीच्या कार्यालयात आज सकाळी आकरा वाजता हजर झाले आहेत. दोन तासांपासुन ईडीच्या कार्यालयात एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार राजकीय हेतूनेच होत असल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

बुधवारी खडसेंना ईडीने समन्स बजावले होते. खडसे यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले होते. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने बुधवारी सकाळी अटक केली होती. विशेष न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!