---Advertisement---

दादांचे नेते माजी आमदार बाबा सिद्दीकी गोळीबारात ठार

By team
On: October 13, 2024 10:02 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री तीन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना वांद्रे पूर्व येथे घडली. गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक उत्तर प्रदेश आणि दुसरा हरयाणाचा आहे.

वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी जंक्शन परिसरात बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. तीन तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळ्या लागून गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना तातडीने उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मयत घोषित केले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार का आणि नेमका कोणी केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गोळीबाराच्या घटनेची नोंद निर्मलनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!