हिंगोली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्यागचा मराठवाड्यातील दुसऱ्या टप्प्याची २४ जूनपासून सुरू करण्यात आली होती. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत सांगितल. कोरोना प्रार्दुभाव कमी झाल्यावर परभणीतून ही यात्रा पुन्हा सुरू करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात जयंत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत #राष्ट्रवादीपरिवारसंवाद दौरा थांबवत असल्याचे @NCPspeaks प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी हिंगोली इथे पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना प्रार्दुभाव कमी झाल्यावर परभणीतून ही यात्रा पुन्हा सुरू करू असे त्यांनी स्पष्ट केले. pic.twitter.com/BDBbbJp6FJ
— NCP (@NCPspeaks) June 29, 2021
आतापर्यंत उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील २३ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बुथ कमिट्या स्थापन करण्याचे व संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी विचारांचा प्रसार करावा, अशा सूचना केल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.