---Advertisement---

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडुन मार्गदर्शंक तत्वे जाहीर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई: कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची असावी अशी मर्यादा राज्यसरकारने घालून दिली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी गणपतींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी विनंती गणेशोत्सव मंडळांनी केली होती.

गणेशोत्सवाला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. राज्य सरकारने कोणतेही धोरण जाहीर न केल्याने गणेशमूर्ती तयार करण्याचे कामही अद्याप सुरू करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मूर्तीकार आणि मंडळांनी सरकारला तातडीने धोरण जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

गणेश मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणपतींच्या मूर्तींवर उंचीची मर्यादा नको, आम्ही करोनाकाळातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी भूमिका घेतली होती. याबरोबरच तातडीने गणेशोत्सव बाबतचे सरकारचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

काय आहेत नियम

● गणेशोत्सवासाठी महामंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

● कोरोनामुळे महापालिका वा स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारावा लागेल.

● गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

● सार्वजनिक गणेश मंडळातील मूर्तीची उंची 4 फूट आणि घरातील मूर्तीची उंची 2 फुटांपेक्षा जास्त उंच असू नये.

● यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर अशा मूर्तींचे पूजन करावे.

● मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं. असे करणे जर शक्य नसेल तर जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.

● स्वच्छेने देणगी दिली तरच स्विकारावी.

● जाहिरातींमुळे गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करण्याला प्राधान्य द्यावे.

● सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम वा शिबिरे घेण्याता यावीत. स्वच्छतेबाबत जनजागृती केली जावी.

● राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध गणेशोत्सवातही कायम असतील. शिथिल केले जाणार नाहीत.

● आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वनी प्रदुषणाचे नियम पाळावेत.

● श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था केली जावी.

● गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था उपलब्ध करावी.

● आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढल्या जाऊ नयेत. विसर्जन स्थळी करण्यात येणारी आरती घरीच केली जावी. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळावर जाऊ नये.

● चाळीतील आणि इमारतीतील गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्र काढू नये.

● महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!