नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा पुढील आरबीआय गव्हर्नर असणार आहेत. पुढील तीन वर्ष ते या पदावर असणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
कोण आहेत संजय मल्होत्रा ?
संजय मल्होत्रा हे महसूल सचिव या पदावर कार्यरत आहेत. मल्होत्रा यांची आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते हे पद सांभाळतील. संजय मल्होत्रा हे 1990 बॅचचे राजस्थान केडरचे IAS (भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी) आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅच आणि राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरमधून कंप्यूटर विज्ञान मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.