ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून बसणार पुन्हा उपोषणाला !

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मात्र,तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली ही आणखी एक संधी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला या माध्यमातून कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र, आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, मनोज जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे-घेणे नाही, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीच्या आधी सरकारला घेरण्याची मनोज जरांगे पाटील यांनी योजना आहे. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून ते पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. त्या आधीच सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!