अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट पंचायत
समितीचे माजी विरोधी पक्ष नेते तथा फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक श्री बाळासाहेब मोरे यांच्या धर्मपत्नी संतोषीताई बाळासाहेब मोरे ( वय – ४२ ) यांचे काही वेळापूर्वी हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून, एक मुलगी असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा आज शनिवारी दुपारी ३ वाजता कुरनूर (ता. अक्कलकोट ) येथील राहत्या घरापासून निघणार आहे.संतोषीताई मोरे या खूप धार्मिक आणि मनमिळावू होत्या.त्यांच्या निधनाने मोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.निधनाने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.