ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुणाचे ही रक्त वाया जावू देणार नाही ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आंतरवाली सराटीतील लाठीचार्जच्या घटनेचा आम्हाला अद्याप विसर पडला नाही. या घटनेत माय-माऊल्यांचे सांडलेले रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही. ही घटना आठवली की, आम्हाला या सरकारचे तोंड पाहू वाटत नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ध्येय व विचारांना महत्त्व दिले जात होते. त्यानुसार आमचे ध्येय व सूत्र ठरले आहे. आम्ही गोरगरीब ध्येयांसाठी आम्ही काम करत आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची आठवण आली की, आजही माझ्या अंगावर काटा येतो. जिवाच्या आकांताने होणारा आरडाओरडा, रक्ताने माखलेली जागा, धूर, लाठीचार्ज, माय- माऊलींच्या किंकाळ्या, अमानुष लाठीचार्ज झाला होता. ही घटना आठवली की आम्हाला या सरकारचे तोंड पाहू वाटत नाही. सरकार एवढे निर्दयी व अमानूष असू नये. त्यांनी मुद्दामहून आत घुसून लाठीमार केला. साऊंड पाडले. आवाज येऊ नये म्हणून वायर कापल्या. साध्या वेशातील त्यांच्या लोकांनी एकमेकांना ढकलणे हे सर्व मी समोर पाहिले. ते आठवले की मन सुन्न होते. त्यामुळे ज्या माय-माऊल्यांचे रक्त सांडले, ते वाया न जाऊ देण्याचा निर्धार मी केला आहे. मी समाजाशी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!