ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता ‘आरटीओ’चा राहणार वॉच : खाजगी वाहनांवर होणार कारवाई !

सोलापूर : प्रतिनिधी

जादा प्रवासी भाडे आकारणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या खासगी ट्रॅव्हलवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने लक्ष ठेवण्यात आले आहे. अशा वाहनावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रवाशांनीही असे प्रकार आढळून आल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनाच्या नंबरसह कळवावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

जास्तीचे भाडे आकारणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या ट्रॅव्हल्ससह विविध खासगी अशा १२ वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. आरटीओने विशेष मोहीम राबवित २० ऑक्टोंबर ते २० नोव्हेंबर या एका महिन्यात अनेक खासगी वाहनांची तपासणी केली. याद्वारे १ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आरटीओच्या पथकाकडून वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासह चालकांची सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. यासोबतच वाहनांतील अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन दरवाजा, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत आहे का, हे तपासले गेले. आसनव्यवस्था यातील अनधिकृत बदल, मोटार वाहन कायद्यातील तरतुद उल्लंघन करर्णाया दोषी बसचालक व मालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!