मुंबई : वृत्तसंस्था
आगमी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून आता सत्ताधारी व वीरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे.
रोहित पवार म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला टोपी घातली. आता विधानसभेलाही लोक असेच प्रत्युत्तर देतील, असा दावा त्यांनी मंगळवारी सत्ताधारी महायुतीवर शरसंधान साधताना केले होते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली भाजप विरोधातील भूमिका स्पष्ट करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण महायुतीसोबत जाण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मास्क व टोपी घालून भेट घेतल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची भर पडली आहे. रोहित पवार यांनी मंगळवारी या प्रकरणी महायुतीवर निशाणा साधताना जनता लोकसभा निवडणुकीसारखीच विधानसभेच्या निवडणुकीतही मतदारांना टोपी घालतील असा दावा केला. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. अमित शहा यांना भेटण्यासाठी जात असताना ते टोपी घालत होते की मास्क घालत होते, याबाबत आम्हाला काहीही सांगता येणार नाही. पण याविषयी त्यांनी स्वतःच भाष्य केल्यामुळे ते सर्वांना समजले आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज्यातील सत्तांतरावेळी टोपी घालत होते. विशेषतः सध्या महायुतीचे सरकार सर्वसामान्य लोकांना केवळ टोपी घालण्याचेच काम करत आहे. पण लोकशाहीच्या माध्यमातून जनतेनेच लोकसभा निवडणुकीत त्यांना टोपी घातली, असे रोहित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.