ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जातं ; पंतप्रधान मोदी आक्रमक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून आज उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा-जेव्हा देशात कमकुवत सरकार आलं, तेव्हा दहशतवादानं देशात हातपाय पसरले. आज देशात बळकट सरकार आहे. आता दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं जातं, असं मोदी म्हणाले. सात दशकांपासून जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० हटवू शकलो, हे मजबूत सरकारमुळे होऊ शकलं, असंही मोदींनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज देशात एक स्थिर सरकार आहे. जनतेने या सरकारचे काम बघितले आहे. मजबूत सरकारमुळे दहशतवाद संपुष्टात आला आहे. काँग्रेसचं सरकार कधीच वन रँक-वन पेन्शन’ लागू करू शकलं नाही. मात्र आमच्या सरकारनं ते लागू केलं. तो सैनिकांचा सन्मान आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये जवानांच्या सुरक्षेसाठी उपकरणे नव्हती. याआधी बुलेटप्रुफ जॅकेटचीही कमतरता होती. आज आधुनिक उपकरणे आहेत.’

‘काँग्रेसचे कमकुवत सरकार सीमांवर आधुनिक सोयीसुविधा देऊ शकलं नाही. आजच्या घडीला सीमेवर रस्ते तयार झाले असल्याचे बघायला मिळेल. भूयार तयार झालेत. हे दशक उत्तराखंडचं असल्याचं काही दिवसांपूर्वी बाबा केदारनाथांचं दर्शन घेताना बोललो होतो,’ असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!