ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला : ३० बुडाले तर ६ पर्यटकांचा मृत्यू ?

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.

मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन यासंदर्भात लक्ष घालून योग्य ती कारवाई निश्चितपणे करेल. स्थानिक प्रशासन, पोलिस प्रशासनासह अन्य शासकीय विभाग त्याठिकाणी निश्चित मदत करतील. मलाही या संदर्भात संपूर्ण माहिती नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली. पूल कोसळला आणि त्यात सहा जणांचे दु:खद निधन झाले आणि काही लोक वाहून गेली, अशी माहिती माझ्या कानावर आली आहे. यासंदर्भात मी अधिक माहिती घेऊन त्याअनुशंगाने जे काही करता येईल, ते केले जाईल. जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे.

गिरीश महाजन म्हणाले, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. पोलिस तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मी देखील थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचत आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

आमदार सुनील शेळके यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!