ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अणदूर येथे १७ डिसेंबर रोजी हलगी महोत्सवाचे आयोजन,  हलगी कलावंताची निघणार रॅली

अक्कलकोट : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर महाविद्यालय,संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव व जय मल्हार पत्रकार संघाच्यावतीनेने मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून १७ डिसेंबर रोजी अणदूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात हालगी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रीय लोक कलेतील हालगी लोककलेनी महाराष्ट्रातच नव्हे तर देश व देशाबाहेरही आपल्या कलेचे सादरीकरण करुन महाराष्ट्राचे मानाचे तुरे रोवले आहेत. पण ही कला उपेक्षित व दुर्लक्षित राहीली आहे, आयुष्यभर दुसऱ्याच्या सन्मानामध्ये हालगी वाजवणा-या कलावंताच्या वाटेला कधी सन्मान मिळाला नाही, त्यामुळे या हालगी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणचे सदस्य उमाकांत मिटकर, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, उपप्राचार्य डॉ मल्लीनाथ लंगडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या महोत्सवात दिडशे हलगी कलावंताचा सन्मान होणार असुन हुतात्मा स्मारक ते श्री खंडोबा देवस्थानपर्यंत या हलगी कलावंताची रॅली निघणार आहे,असे महोत्सवाचे आयोजक जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी,संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके,जय मल्हार पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय अणदूरकर यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!