दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून राज्यात दहा हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
या माध्यमातून राज्यातील सुमारे १०००० तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व सर्व संबंधित उपस्थित होते.#wef23 #Davos #MaharashtraInDavos #WorldEconomicForum #WEF2023
— Uday Samant (@samant_uday) January 16, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मंगळवारी लक्झमबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, जपान बँक, सौदी अरेबियाचे उद्योग व खनिकर्म मंत्री, स्वीस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासमवेत भेटी घेणार आहेत. विविध क्षेत्रांतील नामवंत उद्योगांसमवेत सामंजस्य करारही महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये करण्यात येणार आहेत.
या कंपन्यांसोबत झाले करार
• ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट्स – 12, 000 कोटी
• बर्कशायर हाथवे होम सर्व्हिसेस ओरेन्डा इंडिया – 16, 000 कोटी
• ICP गुंतवणूक/ इंडस कॅपिटल – 16,000 कोटी
• रुखी फूड्स – 250 कोटी
• निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया – 1650 कोटी