मुंबई : वृत्तसंस्था
देशात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. यानिमित्त राज्यात देखील ध्वजारोहण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्रीच ठाण्याच्या जिल्हा शाखेत ध्वजारोहण केले आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”राज्याची अर्थव्यवस्था पुढे आणण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे होते. मात्र सरकारने ते आव्हान चांगल्या प्रकारे पेलले आहे. राज्यात दीड कोटी रोजगार निर्मिती करण्याचे ठरवले आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सरकार काम करत आहे.
गेल्या दोन वर्षांत 5 लाखांपेक्षा जास्त कोटींची गुंतवणूक झाली. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 14% आहे. परदेशातील येणाऱ्या पर्यटकांची सर्वप्रथम महाराष्ट्राला पसंती असते. विकास म्हणजे केवळ उद्योग, रोजगार नाही. गोर गरिबांसाठीही अनेक योजना राबवण्यात आल्या. महिला, युवा, शेतकरी आणि गरिबांना लक्षात घेऊन सरकारने काम केले आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत”, असे शिंदे म्हणाले.