सचिन पवार/
कुरनूर : सालाबदाप्रमाणे याही वर्षी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय यात्रा पंच कमिटीच्या बैठकीत मध्ये घेण्यात आला आहे. ही यात्रा तीन दिवस होणार असून पहिल्या दिवशी अर्थात १७ नोव्हेंबर रोजी देवाला गंध लावणे अर्थात संदल. दुसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवणे. व संध्याकाळी vm ग्रुप आयोजित लावण्यखणी कार्यक्रम.व तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्या आणि संध्याकाळी राहुल काळे युवा मंच व अमरप्रेमी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन ठिकाणी भव्य अशा लावण्यखणी चे कार्यक्रम होणार आहेत.
या यात्रेला मुंबई, पुणे, गुलबर्गा आदी सर्वच भागातून भाविक येत असतात. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेनंतर येणाऱ्या गुरुवारी ही यात्रा भरत असते. यावर्षी पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार आल्याने एक आठवडा ही यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. सतरा अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर असे सलग तीन दिवस ही यात्रा असणार आहे.
दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ही यात्रा ठरत असते या बैठकीला सरपंच व्यंकट मोरे, उपसरपंच आयोग तांबोळी, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे, सोसायटी अध्यक्ष नितीन शिंदे, शाम सुरवसे, लक्ष्मण शिंगटे, किशोर सुरवसे, संभाजी बेडगे, अशोक काळे, शाम जाधव,आदी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागाने सहकार्य करावे.
सध्या कुरनूर धरण हे शंभर टक्के भरले असून दर्ग्याच्या ठिकाणी पाणी आहे. यातील अतिरिक्त पाणी सोडून पाटबंधारे विभागाने सहकार्य करावे. पाणी न सोडल्यास भाविकांना पाण्यातून दर्शनाला जावे लागते. व याचा मोठा त्रास यात्रेकरूंना सहन करावा लागतो – सरपंच व्यंकट मोरे