जयहिंद शुगर तर्फे १९ जानेवारीला ‘संगीत संत तुकाराम’ नाटय प्रयोगाचे आयोजन ; दोन दिवसात होणार तीन नाट्य प्रयोग
अक्कलकोट,दि.१७ : आचेगाव ( ता.दक्षिण सोलापूर ) येथील जय हिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेडने खास करुन जयहिंद शुगरच्या कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकरी, नाट्यप्रेमी तसेच सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील तमाम बांधवांना पाहता यावे यासाठी दि.१९ व २० जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे मनोहर नरे संस्थापित ओमनाट्यगंधा निर्मित्त तुफान विनोदी ‘संगीत संत तुकाराम’ नाटक सादर होणार आहे. या नाटकात दमदार अभिनय व दमदार गाण्यांचा देखणा नजराणा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
या नाटकात मुख्य भुमिकेत ज्ञानेश महाराव व दहा कलाकारांसह साक्षात तुकोबा प्रतिबालगंधर्व विक्रांत आजगावकर यांची कसदार अभिनय पहायला मिळणार आहे. ज्ञानेश महाराव हे मराठी साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आहेत. ते १९८५ सालापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. परखड लेखक,वक्ते, व्याख्याते,नाटककार अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी विविध विषयांवर सडेतोड लेखन केले आहे. तरी जयहिंद शुगर च्या कार्यक्षेत्रातील अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी तसेच सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील तमाम नाट्यप्रेमी यांना हा नाटक विनामूल्य पाहता यावा यासाठी जयहिंद शुगर कारखान्याचे चेअरमन गणेश माने-देशमुख आणि मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने-देशमुख यांच्याकडून निमंत्रितांसाठी खास प्रवेशिकाची सोय करण्यात आली आहे.
दोन दिवसा होणार तीन प्रयोग
दि.१९ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता एक प्रयोग तर दि.२० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता एक प्रयोग आणि ४.३० वाजता एक प्रयोग असे दोन दिवसात तीन नाट्य प्रयोग सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे सादर होणार असल्याचे जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश ( बापू ) माने-देशमुख यांनी सांगितले.