रविवारी 8 जानेवारी रोजी पाचव्या सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन ; 7 जानेवारीला नूमविमध्ये मॅरेथॉन एक्स्पो आणि किटचे वितरण
सोलापूर : सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दि. 8 जानेवारी रोजी आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 7 जानेवारी रोजी नूमवि प्रशालेमध्ये मॅरेथॉन एक्स्पोचे भरवण्यात आलेला आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंना याच एक्स्पो मध्ये टीशर्ट आणि किटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. स्वप्निल कोठाडिया आणि आपटे डेअरीचे संचालक अभिषेक आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या 5 वर्षापासून जानेवारी महिन्यातील पहिल्या रविवारी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे.यंदाच्या वर्षी ही मॅरेथॉन रविवार दि. 8 जानेवारी रोजी होणार आहे. या मॅरेथॉनचे यंदाचे प्रायोजकपद सुप्रसिध्द आपटे परिवाराच्या आपटे डेअरीने स्विकारले आहे. या मॅरेथॉनमध्ये सोलापूर सह इतर जिल्ह्यातील धावपटूंनी मोठ्यासंख्येने सहभाग नोंदवून भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉन ही 21 किमी,10 किमी, आणि 3.5 किमी फन रन या तीन प्रकारात होणार आहे. सर्व धावपटूंनी मॅरेथॉनसाठी योग्य तो व्यायाम आणि झुंबा डान्ससाठी वेळेच्या आधी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर उपस्थित राहावे.
मॅरेथॉनच्या आधी शनिवार दि. 7 जानेवारी रोजी नूमवि प्रशालेच्या आवारात मॅरेथॉन एक्स्पो होणार आहे त्या एक्स्पोचे उदघाटन सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात येणार असून सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत हा एक्स्पो राहणार आहे. विविध स्टॉल्स यामध्ये उभारण्यात आलेले आहेत. तेथेच धावपटूंना टी शर्ट आणि बीबचे वितरण करण्यात येणार आहे. सहभागी धावपटूंनी येताना सोबत आपले ओळखपत्र आणावे.
सोलापूरकरांची ही स्वत:ची मॅरेथॉन अशी ओळख निर्माण झालेली आहे. प्रत्येक सोलापूरकराने या मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गाच्या कडेला उभे राहून धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठयासंख्येने यावे तसेच नेहमीच प्रत्येक शासकीय आणि इतर क्रिडा संस्थांकडून तसेच सोलापूरकरांकडून सहकार्य लाभलेले आहे.यंदाच्या वर्षीही तसेच सहकार्य मिळालेले आहे. मॅरेथॉनमुळे सकाळी काही मार्गावरील वाहतुकीमध्ये दरवर्षी प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.
मॅरेथॉनचा मार्ग आणि वेळ –
21 किलो मिटर – या स्पर्धेतील धावपटूंनी पहाटे 5.30 वा. हजर राहायचे असून योग्य व्यायाम आणि झुंबा डान्स झाल्यानंतर हरिभाई देवकरण प्रशाला येथून सकाळी 6.30 वा. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते झेंडा दाखवून ही स्पर्धा सुरू होणार असून डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता शासकीय विश्रामगृहासमोरून पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौकातून डाव्या बाजुला वळून भारती विद्यापीठ, डी मार्ट समोरून, टाकळीकर मंगलकार्यालय समोरून पुन्हा विजापूर रोड सैफूलमार्गे एसआरपीएफ कॅम्प पासून माघारी येवून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.
10 किलो मिटर – सकाळी 6.45 वा. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते झेंडा दाखवून हरिभाई देवकरण प्रशालेपासून सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता शासकीय विश्रामगृहासमोरून, पत्रकार भवन, विजापूर नाका, आयटीआय चौकातून डाव्या बाजुला वळून भारती विद्यापीठ, गोविंदश्री मंगल कार्यालय समोरून माघारी फिरून पुन्हा त्याच मार्गाने येवून ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.
3.5 किलो मिटरची फन रन – सकाळी 7.30 वा. पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांच्या हस्ते सुरूवात, डफरीन चौक, जुना एम्प्लायमेंट चौक, सातरस्ता येथून पुन्हा त्याच मार्गाने ज्ञानप्रबोधीनी प्रशालेसमोर समारोप होणार आहे.
बक्षिसे आणि वैशिष्ट्ये
– आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉमध्ये सर्वच वयोगटातील स्त्री आणि पुरूष धावपटूंसाठी 32 प्रकारचे बक्षिसे दिली जाणार आहेत. सोलापूरकरांचे कौतुक व्हावे यासाठी 32 पैकी 16 बक्षिसे ही सोलापूरकरांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धा पार पडल्यानंतर सकाळी 9.30 वा. मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर करण्यात येणार आहे.
– यंदाच्या आपटे डेअरी सोलापूर मॅरेथॉन मधून कचरा विलगीकरणसंदर्भात जनजागृती करणार आहे.
– 60 वर्षाच्या पुढील 7 धावपटूंचा 21 किमी मध्ये सहभाग
– सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मॅरेथॉमध्ये सहभाग
– सोलापूरच्या जागरूक डॉक्टराकडून गेल्या 5 वर्षापासून अत्यंत नियोजनबध्द आणि नेटकेपणाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन
– मॅरेथॉन मार्गावर 11 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस, वैद्यकीय मदत केंद्र, 3 ठिकाणी फिरते बायो टॉयलेटची सुविधा
सोलापूर रनर्सची टीम –
अध्यक्ष डॉ. स्वप्नील कोठाडीया, कार्याध्यक्ष डॉ. विश्वास बिराजदार, खजिनदार डॉ. योगेश जडे, रेस डायरेक्टर डॉ. विक्रम दबडे, माजी अध्यक्ष डॉ. यशवंत पेठकर, डॉ. विनायक देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. भास्कर पाटील, डॉ. नितीन बलदवा, डॉ. गोरख रोकडे, डॉ. गुरू जालीमिंचे, डॉ. किरण किणीकर, डॉ. महेश बिलुरे, डॉ. प्रदीप भोई, डॉ. सुभाष भांगे, अभय देशमुख, अजित वाडेकर, बसवराज कडगंची , संजय सुरवसे, जयंत होलेपाटील, श्रीनिवास संगा, स्वप्नील नाईक, रोषण भुतडा, ओंकार दाते, डॉ. विठ्ठल कृष्णा