ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संतापजनक : भररस्त्यावर तरुणांनी केले अश्लील चाळे

पुणे ; वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यातील पुणे शहर  गुन्हेगारी घटनेने चर्चेत येत असतांना आता  पुन्हा एकदा पुणे शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना घडली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू घेण्यास सुरुवात झाली आहे.

पुण्यातील सिग्नलवरती गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरुणांनी अश्लील कृत्य केले आहे. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. व्हिडिओ काढण्यापेक्षा पोलिसांना बोलवत जाब विचारायला हवा. या विकृतांना ठेचून काढले पाहिजे, असे रुपाली ठोबरे यांनी म्हटले आहे.

पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक BMW कार उभी करत मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य केले. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यात महिला दिनाच्या दिवशी भररस्त्यात असा श्रीमंत बापाच्या मुलाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे. कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आयटी क्षेत्राचा आहे. त्या मार्गावर अनेक महिला मुलीची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रातील मुलीवर चाकूने वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला. मागील घटनेपासून पोलिसांनी काहीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!