Skip to content
दिल्ली : देशात सध्या सणासुदीची धामधुम सुरू आहे. नवरात्रौत्सव सुरू असतानाच दिवाळीच्या तयारीचीही सुरुवात झाली आहे. याच दरम्यान, राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज सकाळी दिल्लीतील लक्ष्मीनगर येथून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे.
मोहम्मद अशरफ अली असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो दिल्लीत अली अहमद नुरी नाव धारण करून तो राहत होता. तो पाकिस्तानातील पंजाबच्या नरोवाल येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
बनावट भारतीय ओळखपत्राच्या आधारे ही संशयास्पद व्यक्ती दिल्लीत फिरताना आढळला. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याजवळून AK-47, 50 गोळ्या आणि हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. त्याच्याजवळ भारतीय पासपोर्ट देखील सापडला आहे. पोलिसांना त्याच्याजवळून एक बनावट आयडी देखील सापडला आहे.
अशरफ अली याला पाकिस्तानच्या आयएसआयकडून दिल्लीसहीत भारताच्या इतर भागांत दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आल्याचंही सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी अशरफ अलीकडून बनावट भारतीय पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.