अक्कलकोट (प्रतिनिधी) :- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त असलेल्या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक जाहीर झाले आहे. पंढरपुर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी विविध पक्षांकडून चांगलीच मोर्चे बांधणी चालू आहे. पण पंढरपूर आणि मंगळवेढा येथे धनगर समाजाची लोकसंख्या जास्त असल्याने तेथील मतदारांनी देखील धनगर समाजातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळाली पाहिजे या मागणीसाठी धनगर समाज ठाम आहे.
राष्ट्रीय समाज पक्षांकडून सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल दादा बंडगर यांना उमेदवारी जाहीर करावी ते पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी सर्व धनगर समाजातील लोकांची व पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघातील नागरिकांची इच्छा आहे. यापूर्वी रिडालोसमधून रासपच्या एबी फॉर्मवर भारत भालके हे निवडून आले होते यामध्ये महादेव जानकर यांचा सिंहाचा वाटा होता. पण नंतर भालके यांनी पक्ष बदलला त्यामुळे तेथील धनगर समाज नाराज झाले होते. नंतर रासप महायुतीमध्ये सामील असल्याने महादेव जानकर यांच्या आदेशानुसार रासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रशांत परिचारक व नंतर सुधाकरपंत परिचारक यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले माञ भाजपाला अपयश आले. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात विवीध जाती धर्माचे लोक राहतात. महादेव जानकर हे बहुजन समाजासाठी दिवस रात्र आपल्या कुटुंबाचा विचार न करता या राज्यातील जनताच आपले कुटुंब आहे असे मानून मिळेल तिथे राहून जे काही असेल ते खाऊन बहुजन समाजाला जागे करुन उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी आपल्या देहाचा अग्नीकुंड करीत आहेत म्हणून या विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाजातून यंदा महायुतीतून भाजपाने आपला मिञपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला ही जागा सोडून द्यावी आणि ती जागा जिंकून रासप महादेव जानकर यांच्या विचाराचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी केले आहे.