नवी दिल्ली : पद्मविभूषण आणि प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराने दिल्लीत राहत्या घरी निधन झाले. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते. उत्तम कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. त्यांते नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.
लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ लखनऊ येथे झाला. ते कथ्थक नृत्य कलाकार होते, त्याचबरोबर ते शास्त्रीय गायकदेखील होते. त्यांचे वडील अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेदेखील प्रसिद्ध कथ्थक नृत्य कलाकार होते.
बिरजू महाराज यांना पद्मविभूषण या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी उमराव जान, बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केले. पद्मविभूषण व्यतिरिक्त त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला. त्याचवेळी, २०१२ मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य कोरिओग्राफीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.