सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना विविध योजना अंतर्गत शासकीय मदत मिळवून देणारे आरोग्य मित्र सोलापुरात बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे रुग्णसेवेची प्रारंभ तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळते. या आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आंदोलन केले आहे.
सिटू संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी मंगळवारपासून ते मुदत संपायला सुरुवात केली आहे.
या आहेत आरोग्य मित्रांच्या खालील मागण्या
१) आरोग्य मित्रांना दरमाह रू. २६००० वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायदया नुसार पेन्शन तथा महागाई भत्ता देण्यात यावा. २) वेतनात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात यावी. ३) आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा. ४) सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा (एस. एल. १०, किरकोळ रजा (सीएल) १०, विशेष अधिकार रजा (पी. एल.) ३०, सणाच्या रुजा सुट्या १० लागु कराव्यात. ५) अॅपरॉन ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा. ६) ई-एस-आय. सी. मधील त्रुटींची पुर्तता लवकरात लवकर करून सर्व अरोग्य मित्रांना ई. एस. आय. सी. कार्ड देण्यात यावे. ७) सन २०१२ पासुन डिसेंवर २०२१ पर्यतचे अनुभव सर्टीफीकेट देण्यात यावे. ८) आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जनआरोग्य योजनेचे सन २०१८ पासुन बिना वेत्तन काम करीत आहेत. सन २०१८ पासुन जॉयनिंग लेटर व मोबदला देण्यात यावा व जॉयनिंग लेटरवर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असवा. ९) आरोग्य मित्रांचे इतर जिल्हयात बदलीचे धोरण रद्द करावे – १०) आरोग्य मित्र रमेश पंडीत वैसाणे यांना पुर्ववत कामावर रूजु करून घेण्यात यावे तसेच गणेश अशोक शिंदे यास पुर्वीप्रमाणे नाशिक मध्ये काम देण्यात यावे. ११) टीपीए बदल्याल्यानंतर नविन टीपीए मार्फत आरोग्य मित्र काम करतात परंतु ५ वषपिक्षा जास्त सेवा होऊनही अरोग्य मित्रांना उपादान दिले नाही तरी सदरचे उपादान देण्यात यावे. अशा तब्बल 11 मागण्यांसाठी अबे मुदत संप सुरू करण्यात आलेला आहे.