ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…पवारांची सोंगटी आणि करवली ; ठाकरेंची तुफान फटकेबाजी

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील हर्सुल परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे येताच मोठ्या उत्साहात जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे रवाना झाला. यावेळी राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी देखील केली आहे.

संजय राऊत हे शरद पवारांची सोंगटी आणि करवली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तर पवारांच्या उंबरठ्यसावर बसून ते आपले संपूर्ण आयुष्य झिजवणार आहेत. अजित पवार कधीच जातीय राजकारणात पडले नाही, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले की, आपले सरकार तरुणांना योग्य माहिती देत नाही. राज्यात 60 टक्क्यांवर रिक्षाचालक इतर राज्यातील आहेत. जर तो रोजगार आपल्या मुलांना मिळाला असता तर 1 कोटी मुलांना रोजगार मिळाला असता, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, 2006 सालापासून आजपर्यंत माझी एकच भूमिका आहे, आर्थिक बाबीवर आरक्षण द्यायला हवे अशी माझी भूमिका आहे. यानंतर माझी भूमिका आहे की जर महाराष्ट्रात जर पहिला विचार महारार्ष्टातील मुलांचा झाला तर आरक्षणाची गरज पडणार नाही. आर्थिक दृष्टीने जो मागास आहे त्याला आरक्षण द्यायला हवे.
दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील असे आज तरी वाटत आहे. या दृष्टीने हा दौरा सुरू आहे. 30 तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होणार आहे. मी दौरा आटोपता घेतला नाही केवळ मी जे मुक्काम करणार होतो ते केले नाही, यामुळे दौरा लवकर पूर्ण झाला, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जे राजकारण करायचे आहे ते करा. मात्र, आमच्या नादी लागू नका, नाहीतर माझे पदाधिकारी जर पेटले तर तुम्हाला राज्यात एकही सभा घेता येणार नाही, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिला आहे. लोकसभेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे विष पसरवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!