ध्यास विश्वसार्ह बातमीचा

Paytm ची जबरदस्त ऑफर, आता मोफत मिळणार गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसं?

नवी दिल्ली – सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसीडीमुळे सामान्य ग्राहकांना जवळपास ७०० ते ७५० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र आता ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. आता गॅस सिलिंडर मोफतही मिळवता येऊ शकतो.  पेटीएमने (PayTm) गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. Paytm च्या या ऑफरद्वारे एक महिन्याचे गॅस सिलिंडरचे पैसे आता वाचवता येणार आहेत.

पेटीएमची योजना काय?

गॅस सिलिंडर मोफत हवे असेल तर त्यासाठी ग्राहकांना पेटीएम अ‌ॅपच्या माध्यमातून गॅस बुकिंग करावे लागेल. किंवा आयव्हीआरएस (IVRS) च्या माध्यमातून गॅस बुक केल्यानंतर पेटीएमच्या माध्यमातून पैसे द्यावे लागतील. त्यानंतर पेटीएमकडून ग्राहकांना कॅशबॅक दिला जाईल. कमीतकमी 500 रुपयांपर्यंतच्या गॅस बुकिंगनंतर ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. ही योजना 31 जानेवारी रोजी समाप्त होईल.

पेटीएमकडून चालवली जाणारी ही योजना 31 जानेवारी रोजी समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कॅशबॅक योजनेचा एकदाच लाभ मिळेल. पेटीएम अ‌ॅपच्या मध्यमातून पहिल्यांदा गॅस बूक केल्यानंतर ही योजना आपोआप अ‌ॅक्टिव्हेट होईल. एचपी, इंडेन किंवा भारत गॅस या कंपन्यांचे गॅस बुक केल्यानंतर कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना एक स्क्रॅचकार्ड दिले जाईल. हे कार्ड स्क्रॅच केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात कॅशबॅकची रक्कम 24 तासांच्या आत जमा ग्राहकांच्या पेटीएम व्हॅलेटमध्ये जमा होईल.

 

दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडर बुक करताना प्रत्येक स्क्रॅच कार्डची वैधता 7 दिवसांच्या आत समाप्त होईल असे पेटीएमने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!