---Advertisement---

नाना पटोलेंच्या ‘त्या’ विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ

On: January 22, 2021 5:34 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असं वेळोवेळी सरकारकडून सांगण्यात येत असलं तरी आघाडीतील काही नेत्यांच्या वक्तव्यामुळं संभ्रम वाढत चालला आहे. अशातच आता विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाविकास आघाडीसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. राज्यातील हे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून पुढील निवडणुकांमध्येही तिन्ही पक्ष एकत्र असतील असं वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत कसा येईल असं सांगत सूचक विधान केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, “आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल”.

दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!