छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवार, 13 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता दाखल होत आहे. त्यासाठी सकाळी 11 वाजेपासून सिडको ते क्रांती चौक असा साडेतीन किमीचा जालना रोड सकाळी 11 ते सायंकाळी 5 असा 7 तास बंद राहणार आहे. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल या अत्यावश्यक सेवांना यातून सूट असेल. या रॅलीमुळे शनिवारची कारागृह शिपाई भरती रद्द करण्यात आली आहे.
सरकारी कार्यालये सुरू राहणार.एसटी व स्मार्ट बस सेवा सुरू रॅलीच्या मार्गात नसलेली सर्व बाजारपेठ सुरू राहणार रॅलीच्या मार्गावर नसलेली खासगी कार्यालये व दुकाने सुरू राहतील विमानसेवा सुरू.
शहरातील 750 शाळा बंद 107 कॉलेज बंद राहणार. विद्यापीठासह 55 विभाग खासगी कार्यालये अघोषित बंद. 13 जुलैची शिपाई भरती पुढे ढकलली, ही मैदानी चाचणी 3 ऑगस्टला शनिवार आणि रविवारी टीईटी घेतली जाणार होती. ही चाचणी आता रविवार आणि सोमवारी घेतली जाईल. बस : मध्यवर्ती बसस्थानकावरून जालना, बीड, धाराशिवकडे जाणाऱ्या बस केम्ब्रिज चौक – झाल्टा फाटा ते बीड बायपासने महानुभाव आश्रम चौक मार्गाने जातील. मध्यवर्ती बसस्थानकावरील बस पंचवटी मार्गे पुणे, मुंबई, सातारा, धुळ्याकडे जातील. सिडको बसस्थानकावरून जाणाऱ्या बस धूत रुग्णालयाच्या मार्गे जातील. सिडको बसस्थानकावरून येणाऱ्या बस केम्ब्रिज चौक-झाल्टा फाटा ते बीड बायपास महानुभाव आश्रम चौक मार्गे जातील.
अत्यावश्यक सुविधा
रुग्णवाहिका व रुग्णालये, ओपीडी सुरू राहणार. दूध, किराणा, भाजीपाला, मेडिकल यासह अत्यावश्यक सुविधा
रेल्वेने येणारे प्रवासी : रेल्वेस्टेशन, अयोध्यानगरी, पंचवटी, बाबा पेट्रोल पंपमार्गे शहरात प्रवेश करता येईल.
विमानाने येणारे प्रवासी : केम्ब्रिज चौक- झाल्टा फाटा ते बीड बायपास, पैठण रोड, रेल्वेस्टेशन, अयोध्यानगरी, बाबा पेट्रोल पंपमार्गे शहरात येता येईल.
हे मार्ग बंद : केम्ब्रिज चौक ते नगर नाका चौक अहिल्यादेवी होळकर चौक ते सिल्लेखाना
शनिवारी शहरात ढगाळ वातावरण राहील. शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दिवसाचे तापमान 29 अंश सेल्सियसपर्यंत राहील.
16 हजार रिक्षा बंद
जालना रोडवरील 50 हॉटेल, दुकाने बंद राहणार.
ट्रॅव्हल्स, टॅक्सीही अघोषित बंद.
गोरगरीब मराठा समाज आरक्षणासाठी एकजुटीने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांची ताकद हीच माझी शक्ती असून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता संपूर्ण राज्य पिंजून काढणार. सकल मराठा समाजाची मते जाणून घेऊन विधानसभेचा निर्णय घेतला जाईल. बंद दाराआड चर्चा, बैठका होणार नाहीत. सर्व ओपन मैदानावर होईल. समाजाने 288 मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यानुसार पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ. नाही तर कुणाला पाडायचे हेही समाजच ठरवेल. सर्वानुमते उमेदवार दिला जाईल. समाजाचा निर्णय अंतिम असेल. अठरापगड जातीला सोबत घेऊन उमेदवार ठरवू व जिंकूही. ज्यांना कात्रजचा घाट दाखवायचा त्यांना तो दाखवला जाईल. सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मात्र, ते राजकारण करण्यातच गुंग आहेत. येत्या निवडणुकीत त्यांना समाज जागा दाखवून देईल.