मेष : गुंतवणुकीसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. घरातील बदल या विषयावरही महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले काही विशेष यश मिळवू शकतील. कुटुंबासोबत मनोरंजन आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्येही वेळ जाईल. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना आता वेग येईल.
वृषभ : दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यासाठी नियोजन कराल. इतरांच्या विचारांपेक्षा आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून वाटचाल सुरु ठेवा. जवळच्या मित्रांशी वाद टाळा. जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. नकारात्मक परिस्थिती संयमाने हाताळा.
मिथुन : कुटुंबात धार्मिक यात्रेशी संबंधित नियोजन होईल. आज बहुतांश वेळ कुटुंबासोबत व्यतित करा. ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहू शकते. करिअर आणि कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
कर्क : आज ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रभावशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल, जो पुढे जाण्यासाठी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते.
सिंह : मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात यश मिळेल. मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातेसंबंध सुधारण्यास तुमचं विशेष योगदान असेल. समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या. अनावश्यक प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात उदासीनता जाणवेल.
कन्या : काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज दूर होईल. आत्मविश्वास तुमची कार्ये पूर्ण कराल. तरुणाई करीअरबाबत अधिक गंभीर असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळतील. कुटुंबातील समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी रहील.
तूळ : तुम्ही तुमच्या कार्याला नवीन स्वरुप देण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. नातेवाईकांशी मतभेद टाळा. कोणत्याही परिस्थितीचे संयम कायम ठेवा. अन्यथा तुमची प्रतिमा डागळू शकते. वैयक्तिक कारणांमुळे व्यवसायात अधिक लक्ष देता देणार नाही.
वृश्चिक : दिवसाच्या सुरुवात सकारात्मक होईल. मनाप्रमाणे कार्यसिद्धी झाल्याने मन प्रसन्न होईल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. व्यवसायात यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. अतिकामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो.
धनु : आज नातेवाईकांशी केलेली चर्चा फायदेशीर ठरेल. मात्र चुकीच्या कामांवर केलेला खर्च त्रासदायक ठरेल. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. कोणतेही काम शांततेमध्ये पूर्ण करा. मान्यवरांचे सहकार्य व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.
मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, तुम्ही तुमच्या कार्यप्रती समर्पित राहा. वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्तता राहील. अतिआत्मविश्वास टाळा. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रातील बहुतेक कामे सुरळीत पार पडतील. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी काळजी घ्यावी.
कुंभ : आज सामाजिक कार्यात तुमचे निस्वार्थ योगदान राहील. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात, त्यावर लक्ष केंद्रित करा. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहणे चांगले. घर आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मीन : तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकारा. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागले. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या.