पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून अजित पवार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मोठी मागणी व होर्डीग देखील अनेक शहरात झळकले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील हीच मागणी पुन्हा केल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे.
कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अजित पवार गटाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. काल सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांच्या गटावर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना दिसून आले. अनेकदा शरद पवारांनी भूमिका बदलली आहे. कुणाच्या आदेशावरून बैठका होत्या? असा प्रश्न अजित पवारांच्या गटाने उपस्थित केला आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले कि, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून जनतेने ते दाखवून दिले आहे. भाजपनंतर राज्यात अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असल्याचेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आपण तर कोणालाही शुभेच्छा देतो, मग अजित पवार मुख्यमंत्री होणार म्हटले की, शरद पवार गटाचे नेते नाही म्हणतात. अरे इतका दुरावा का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे असेल तर जास्तीत जास्त आमदार आणि खासदार आपल्याला निवडून आणावे लागतील, त्यासाठी प्रत्येक समाजाला सोबत घ्यावे लागणार असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.