अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील लोकनेते स्व.ब्रह्मानंद कृष्णात मोरे यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि.५ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. दरवर्षी मोरे प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिर, गोरगरिबांना मदत, कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावा, काव्यसंमेलन, कीर्तन असे अनेक उपक्रम राबविले जातात. कोरोना काळात अनेक उपक्रम राबवून प्रतिष्ठानने सामाजिक कार्य केले आहे. यंदा रक्तदान व कीर्तन आयोजित करण्यात आले आहेत.
बुधवारी,सकाळी १० वाजता बादोला रोडवरील अंबाबाई मंदिर येथे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक विश्वनाथ भरमशेट्टी हे राहणार आहेत.यावेळी गावातील भास्कर मोरे, नीलप्पा लोहार, संतोष काळे ,बापूराव सुरवसे, नागनाथ कोकरे, रामचंद्र कोळी या माजी सैनिकांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मेजर प्रशांत मोरे यांच्या हस्ते होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये ह.भ.प शिवलीलाताई पाटील महाराज (बार्शीकर) यांचे विनोदी कीर्तन होणार आहे. या कीर्तन सोहळ्याचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होईल. प्रतिमापूजन मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार देशमुख हे राहणार आहेत.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रमोद मोरे, ज्येष्ठ नेते प्रभाकर मजगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे,माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम बिराजदार, माजी उपसभापती स्वामीराव पाटील, माजी सरपंच विनायक पाटील, ह.भ.प आबा महाराज कुरनूरकर, बाबासाहेब वि.पाटील, ह.भ.प बाबुराव शिंदे महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विनोद मोरे यांनी केले आहे.
गुणी जणांचा होणार गौरव
यावेळी सुरेखा सुरवसे (आदर्श माता ),आबा मोरे (आदर्श शेतकरी), समर्थ काळे (आदर्श व्याख्याता), मनोज बंडगर ( वैद्यकीय सेवा ), सचिन पवार (आदर्श पत्रकार), रानबा काळे (समाजसेवक), संजय गवळी (आदर्श शेतमजूर ) तसेच निशा मोरे, कार्तिक शितोळे, श्रद्धा मोरे यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.