मुंबई : देशातील पेट्रोल-डीझेलची वाढती किंमत सर्वसामान्यांना चटका लावते आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावरून केंद्र सरकारवर टीका देखील होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. आज बुधवारी २४ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणतीही वाढ झालेली नाही. १२ दिवसानंतर दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचे दर ९७.३४ रुपये प्रती लिटर आहे तर डिझेलचे दर ८८.४४ रुपये आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९९.४५ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९०.९३ रुपये आहे. डिझेल ८१.३२ आहे. चेन्नईत पेट्रोल ९२.९० तर डिझेल ८६.३१ रुपये दर आहे.
कोलकात्यात पेट्रोल ९१.१२] डिझेल ८४.२० रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.९८, डिझेल ८६.२१, मध्य प्रदेशात डिझेलचा सर्वाधिक ८९.६० रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९८.९६ रुपये आहे.