ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जनतेचा कौल नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव;माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा भाजपवर निशाणा

सचिन पवार

अक्कलकोट, दि. १४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर पडत असल्याने अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपा निशाणा साधला आहे. घटनेच्या तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेतल्या जातात आणि घेत होते. पण अलीकडच्या काळामध्ये जवळजवळ दोन वर्षे झाले अजून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा पत्ता नाही. भाजप सरकारकडून लोकशाहीची पायमल्ली होत असून त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण नाही. त्यामुळेच या निवडणुका कधी कोरोनाचे कारण,कधी ओबीसी आरक्षण या कारणामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे.

कित्येक दिवस प्रशासक म्हणून अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करत आहेत मात्र लोकप्रतिनिधी म्हणून केव्हा निवडून जाणार आणि जनतेचे प्रश्न केंव्हा सुटणार असा सवाल माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की, भाजपला हिंदुत्ववादी विचार दिसतात आणि जातीपातीचा राजकारण करून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता देशातील तरुणांनी जागे व्हायला पाहिजे आणि या सरकारला धडा शिकवला पाहिजे. सत्तेचा अहंकार चढलेल्या भाजप सरकारला खाली खेचा,असेही त्यांनी यावेळी सांगितले.दरवेळी नवीन मुद्दा उपस्थित करून लोकांचे लक्ष विचलित करायचे हा भाजप सरकारचा डाव आहे. महागाई,बेरोजगारावर हे कधीच भाष्य करत नाहीत. त्यामुळे या देशात एक प्रकारे हुकूमशाही चालू आहे.जे काही करेल ते सही.हे सर्व लोकांना आता माहिती झाले आहे त्यामुळे यांचा पराभव येणाऱ्या निवडणूकीमध्ये अटळ आहे. त्यामुळेच निवडणुका वारंवार पुढे ढकलत आहेत,असा आरोप त्यांनी केला आहे.

फुगीर आकडे सांगून जनतेची दिशाभूल

रस्त्याच्या कामाबद्दल निधीचा घोषणा करून फक्त फुगीर आकडे सांगत आहेत. तालुक्यातील रस्ते मात्र अजूनही जैसे थे आहेत व मंजूर झालेल्या रस्त्याचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहेत. हे जनतेला समजले पाहिजे. निकृष्ट पद्धतीने होत अससेल्या रस्त्याच्या कामाबद्दल त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. जनतेच्या करातून ही निधी आपल्याला मिळतो, त्याचा गैरवापर होऊ नये. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनतेने धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हावे

– सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!