---Advertisement---

पुलवामा हल्ल्यातील जवानांना कुरनूर येथे श्रद्धांजली अर्पण

Follow Us:
---Advertisement---

कुरनूर दि.१४ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे १४ फेब्रुवारी २०१९रोजी झालेल्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. एकीकडे देशभरामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना दुसरीकडे मात्र सैन्य भरती आणि मधील पोलीस भरती करणारे युवक हे एकत्र येऊन श्रद्धांजली वाहत आहेत यातून देशभक्तीचा जागर होतो. आणि यापुढेही अशाच प्रकारे देशभक्ती बद्दल प्रेम असू द्या आणि देशाच्या सेवेसाठी तरुणांनी तत्पर असावे अन तरुणांनी स्वतःला व्यसनापासून अलिप्त ठेवावे.

खरंतर ग्रामीण भागामधील तरुण हे सैन्य भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती होतात. आपल्या गावातली मुले हे सैन्यामध्ये आहेत आणि अजून ही काही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. असे मार्गदर्शन करताना आणि मनोगत व्यक्त करताना तरुणांना केशव मोरे, दिगंबर जगताप, तुकाराम जावीर, बाबासाहेब पाटील, बालाजी मोरे, यांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले.

यावेळी उपसरपंच आयुब तांबोळी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष केशव मोरे, दिगंबर जगताप, तुकाराम जावीर, बालाजी मोरे, अमोल काळे, बाबासाहेब पाटील, अर्जुन सलगरे, समर्थ चव्हाण, सोहेल तांबोळी, नारायण शिंदे, आनंद खांडेकर, प्रवीण निंबाळकर, प्रेम मोरे, नितीन सलगरे, सिद्धार्थ इंडे, मेहबूब पठाण ,सुरेश कोळी, आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!