ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्र व राज्याच्या शेतकरी सन्मान योजना लाभाचे वितरण

मुंबई : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवार 28 रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास योजना चे लोकार्पण तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान योजना लाभाचे वितरण देखील त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार 28 रोजी महाराष्ट्र केरळ व तामिळनाडू या तीन राज्यांच्या दौऱ्यावर येत आहेत पंतप्रधानांच्या हस्ते पंचवीस हजार रुपये कोटींच्या विविध योजनांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात येणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचे तर नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण देखील करण्यात येणार आहे याशिवाय आयुष्यमान कार्ड पंतप्रधान आवास योजनेसह प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनांचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पीएम किसान योजनेंतर्गत सुमारे साडेचार लाखाहून अधिक लाभार्थी आहेत. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्रमाणे समान तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये लाभ देण्यात येतो. त्यानुसार आतापर्यंत १५ हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. २०२३-२४ अंतर्गत शेवटचा हप्ता लाभ यासह राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रकमेचे वितरण डिबिटी अंतर्गत वितरीत केले जाणार आहेत.

शेत मशागतीसह खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी मदतच
28 फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सोळाव्या हप्त्याचे तर राज्य शासनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचा शेतकरी सन्मान योजनेच्या लाभाचे रकमेमुळे शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसह शेती मशागतीसाठी एक प्रकारे आर्थिक मदतच होणार असल्याचे शेतकरी वर्गांमधून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!